B.D. Patil passes away Sarkarnama
पुणे

B.D. Patil Passes Away: राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आधार हरपला... बी. डी. पाटील यांचे निधन

Farmers Association leader B.D. Patil Passes Away: बी.डी.पाटील यांनी ४० वर्षे अहिंसात्मक मार्गाने खंडकरी शेतकऱ्यांसाठी लढा दिला. माजी खासदार कै.माधवराव गायकवाड व माजी खासदार कै.शंकरराव पाटील यांच्यासोबत खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

सरकारनामा ब्यूरो

वालचंदनगर (पुणे): ८० वर्षे शांततेच्या मार्गाने खंडकरी शेतकऱ्यांसाठी लढा देणारे महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भिकाजी दशरथ पाटील उर्फ बी. डी. पाटील (वय 85) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.'आण्णा'या नावाने ते परिचित होते.

दहिगाव (जि.सोलापूर) येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ ,बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. कृषी अधिकारी धैर्यशील पाटील व इंदापूर अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष,वालचंदनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सत्यशील पाटील हे त्यांचे पुत्र होत.

राज्यामधील खंडकरी शेतकऱ्यांना २५ हजार एकर जमीन मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. नानासाहेब देशमुख यांच्यासोबत सदाशिवनगरमधील शंकर सहकाही साखर कारखाना येथे संचालक म्हणून काम केले. एस. टी. महामंडळ व कॉटन फेडरेशन व बोर्डिंग हाऊसचे संचालक पदावर त्यांनी काम केले. काँग्रेसची विचारधारा जपणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते.

दहिगाव (ता.माळशिरस,जि.सोलापूर) येथील बी. डी. पाटील यांनी कळंब (ता.इंदापूर) येथील वालचंद विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कामास सुरवात केली होती. सोलापूर जिल्हातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून समाज कार्यास सुरुवात केली.

८० वर्षे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. बी.डी.पाटील यांनी ४० वर्षे अहिंसात्मक मार्गाने खंडकरी शेतकऱ्यांसाठी लढा दिला. माजी खासदार कै.माधवराव गायकवाड व माजी खासदार कै.शंकरराव पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT