Sunanda Pawar Latest Marathi News, NCP MLA Rohit Pawar Latest Marathi News  Sunanda Pawar Facebook Post
पुणे

रोहित आणि वडिलांमधील नातं कसं आहे? सुनंदा पवार यांची भावनिक पोस्ट

पितृदिनानिमित्त सुनंदा पवार यांची भावनिक पोस्ट.

सरकारनामा ब्युरो

पुणे : वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पितृदिन. सोशल मीडियात वडिलांशी असलेल्या नात्याविषयी मुला-मुलींकडून सोशल मीडियात भावना व्यक्त केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही रोहित आणि वडील राजेंद्वर पवार यांच्या नात्यातील बंध उलगडले आहेत. (Sunanda Pawar Latest Marathi News)

सुनंदा पवार यांनी पितृदिनानिमित्त एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी वडील आणि मुलाच्या नात्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, आज समाजात वडील व मुलगा यांचं नातं सहसा भिती, धाक या भावनांमध्ये दबलेले असते. मुलगा म्हणून वडिलांकडे काही हट्ट करायचे असतील तर ते आईच्या माध्यमातून करायचे असा समज मुलांच्यात असतो. (Father's Day Latest Marathi News)

आजच्या युगात फार कमी कुटुंबात वडील व मुलगा यांचे नाते अतिशय मनमोकळे व मैत्रीपूर्ण असते. जन्मापासून अगदी वयात येईपर्यंत वडील म्हणून आपल्या मुलांचा विचार करणारे पालक फार कमी पाहायला मिळतात. काॅलेजमधे असताना अथवा व्यवसाय, नोकरी करताना स्वतःच्या आवडी निवडी मुलांच्या वरती न लादता मुलांना काय हवय, काय झेपेल हे जाणून त्यांच्या यश-अपयशात खंबीरपणे एक मित्र म्हणून पाठीशी उभे रहाणे हे वडिलांचे कर्तव्य असते, असं सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे.

यातुन वडील व मूल हे नाते अधिक घट्ट होते, मोकळेपणाचे रहाते, कितीही अडचणी आल्या तरी मुलं आपल्या वडिलांपासून कोणत्याही चुका, अडचणी, चुकीचे निर्णय लपवत नाहीत, उलट वडिलांबरोबर मनापासून शेअर करतात,मार्ग शोधतात आणि आपल्या हातून परत अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेतात, अशी भावना सुनंदा पवार यांनी व्यक्त केली आहे.

वडील आणि मुलगा म्हणून एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात किती हस्तक्षेप करायचा हे ज्या नात्यांना कळते ती नाती घट्ट व मनमोकळी राहातात. थोडक्यात पालकांना आपल्या मुलांशी जिवाभावाचा मित्र बनता आले पाहिजे. हेच नाते रोहित व राजेंद्र दादांनी जपल्याचे सुनंदा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT