Eknath Shinde Sarkarnama
पुणे

निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने, पुणे हद्दीतील गावे वगळण्याचा भाजप-शिंदे गटाचा डाव?

Pune Muncipal Corporation : एकहाती सत्ता मिळवण्यात भाजप आणि शिंदे गटाला अडचणीचे ठरणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेले चौतीस गावे पुन्हा वगळण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या चौतीस गावांमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे, यामुळे महानगरपालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यात भाजप आणि शिंदे गटाला अडचणीचे ठरणार आहे. पुरंदर व हवेली येथील गावे वगळण्यात यावे, अशी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. यावरून आता राजकीय घमासान होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मागील वर्षी महाविकासआघाडी सरकार असताना या गावांचा समावेश महापालिकेत केला गेला होता. या निर्णयाला भाजपचा पहिल्यापासूनच विरोध होता. न्यायालयीन संघर्षानंतर या गावांचा समावेश महानगरपालिकेत करण्याचा निर्णय झाला.

मोदी लाटेवर स्वार होत पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर २०१७ सालच्या ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा अकरा गावांचा समावेश करण्यात आला होता. यानंतर बाकी राहिलेले तेवीस गावे पुढच्या चार वर्षांनी महापालिकेत घेण्यात आली. या नव्याने समाविष्ट होणाऱ्या ३४ गावातून केवळ ४ नगरसेवकांची संख्या वाढेल, असे सांगण्यात येत होते.

मात्र प्रभाग रचनेच्या निर्णयानंतर तब्बल ३९ नवे नगरसेवक असणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पालिकेतील सत्तासमीकरणात ही गावे निर्णायक ठरणार आहे. यामुळे भाजपसाठी राजकीय हा मोठा पेच निर्माण झाला आहे. आता ही गावे वगळून आगामी निवडणूक घेण्याचा डाव भाजपकडून आखण्यात येणार असल्याचे, समजते आहे.

विजय शिवतारे यांचे एक पत्र चर्चेत आहे. पुरंदर हवेली तालुक्यातील काही गावे वगळण्यात यावी, या गावांना पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अशी त्यांनी मागणी केलीआहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT