पुणे

स्वप्निल लोणकर आत्महत्येची थट्टा करणाऱ्या ठाकरे सरकारवर ३०२ दाखल करा!

सरकारनामा ब्युरो

पुणे : स्वप्निल लोणकरचं (Swapnil Lonkar) या मृत विद्यार्थ्यांचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहेत. वाघ, पडळकरांनी टि्वट करीत ठाकरे सरकारवर (thackeray government) हल्लाबोल केला आहे.

एमपीएससी MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखत होत नसल्याच्या नैराश्यातून हडपसर (पुणे) स्वप्निल लोणकर या तरुणानं गेल्या वर्षी २९ जूनला आत्महत्या केली होती. या घटनेला ६ महिने उलटल्यानंतरही मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत मृत स्वप्निलचं नाव देण्यात आलं आहे. स्वप्निलला ७ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ८ वाजता मुलाखतीसाठी बोलवण्यात आलंय. पण स्वप्निल लोणकर आता आपल्यात नाही. २९ जूनला सुसाईड नोट लिहित त्यानं आत्महत्या केली होती. त्यामुळे एमपीएससीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

आपल्या टि्वटमध्ये गोपीचंद पडळकर म्हणतात, ''आधी उत्तीर्ण होऊन दीड वर्ष झाली तरी मुलाखतीला बोलवलं नाही. म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं आता आत्महत्येचीही क्रूर थट्टा करतायेत. प्रस्थापितांच्या सरकारला कसलीच लाज उरली नाहीये. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या या गिधाडी प्रवृत्तीचा धिक्कार असो,'' विरोधकांसह विद्यार्थ्यांतूनही प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. ''एमपीएससीनेच माझ्या मुलाचा बळी घेतला,'' अशी संतप्त प्रतिक्रिया संदीपच्या वडीलांनी दिली आहे.

स्वप्नील लोणकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील फुरसंगी येथे गळफास लाऊन त्याने आत्महत्या केली होती. २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. त्यानंतर १ वर्षे उलटूनही एमपीएससी आयोगाने मुलाखतीची यादी प्रसिद्ध केली नाही, या नैराश्यातून स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली होती. एमपीएससीने नुकतीच मुलाखतीसाठी यादी जाहीर केली आहे. त्यात स्वप्नीलचे नाव आले आहे.

भाजपचे नेत्या चित्रा वाघ यांनी याविषयावर संताप व्यक्त केला आहे. '‘ही तर सरकार प्रेरित हत्या! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं ६ महिन्यानंतर मुलाखतीच्या यादीत नाव आलंय. स्वप्नील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी ठरल्याचं खुद्द सरकारनं कबूल केलं. या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा.’ असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT