Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन महिला पदाधिकाऱ्यांमधील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांचे प्रवक्ते पद काढून घेतला असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यातच आता रूपाली ठोंबरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. एका प्रकरणामध्ये रूपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाले असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात चाकणकर यांनी पीडितेचे चरित्रहनन केल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला होता. यानंतर पक्षाने ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि त्यांच्या प्रवक्तेपदावरून काढून टाकले.
या घटनांमुळे ठोंबरे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या असून, इतर पक्षांकडून त्यांना ऑफर मिळाल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठोंबरे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेवर मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून ठोंबरे यांच्या बहिणी प्रिया सुर्यवंशी, मावशी वैशाली पाटील, पूनम गुंजाळ आणि अमित सुर्यवंशी यांच्यासह चार जणांविरुद्ध ३१ ऑक्टोबर रोजी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
खंडाळकर यांनी ठोंबरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या बहिणीने मारहाण केल्याचा आरोप केला होता. यापूर्वी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर रक्तबंबाळ अवस्थेचा व्हिडिओ शेअर करत ठोंबरे यांच्यावर गुंड पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता.या गुन्ह्याच्या नोंदीविरोधात ठोंबरे यांनी थेट खडक पोलिस स्टेशनला धाव घेतली. तेथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची भेट घेत त्यांनी गुन्हा कसा दाखल केला, असा जाब विचारला.
"
वाद मिटला असताना पुन्हा तक्रार कशी? राजकीय दबावाखाली हे केले जात आहे," असे म्हणत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.मात्र, या वेळी त्यांचे आक्रमक वर्तन आणि 'अरेरावी'मुळे आणि पोलीस चौकीमध्ये बेकायदा गर्दी जमवल्या प्रकारे भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रूपाली ठोंबरे यांच्या अडचणीत बोल जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.