Kasaba Peth Election | Mukta Tilak |Shailesh Tilak Sarkarnama
पुणे

Kasaba Peth Election : टिळक कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया ; 'पक्षाने संधी दिली तर...'

Kasaba Peth Election : उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच..

सरकारनामा ब्यूरो

Kasaba Peth Election : निवडणूक आयोगाने राज्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.यामध्ये पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. दिवंगत मुक्ता टिळक यांच्यानंतर कसबा विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. यावर टिळक कुंटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक यांनी पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यानंतर आमच्याच घरात उमेदवारी मिळावी, ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील," असे शैलेश टिळक यांनी म्हंटले आहे.

पुढे ते म्हणाले, "मुक्ता टिळकांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केलं आहे. त्यांचं कसबा मतदारसंघासाठी काम पाहता, ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा, अशी भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केली. "

मी अनेक वर्ष मुक्तासोबत काम केलेल आहे, कुणाल देखील चांगलं काम करत आहे. पक्षाकडून आम्हाला संधी दिली मिळाली, तर नक्कीच आम्ही ही निवडणूक लढवणार, अशी शैलेश टिळक यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना ७५ हजार ४९२ मते मिळाली होती. तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना ४७ हजार २९६ मते मिळाली होती. या मतदार संघात एकून १८ नगरसेवक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT