ncp, congress
ncp, congress sarkarnama
पुणे

राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसही लागले तयारीला ; इच्छूकांकडून मागवले अर्ज

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण (OBC Reservation) देण्याचा महाराष्ट्र राज्य ओबीसी आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकताच (ता.३ मार्च) फेटाळला. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाला (State Election Commission) दिला. मात्र, सर्वच राजकीय पक्षांना ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्यास कडाडून विरोध केला आहे. राज्य मंत्रीमंडळानेही त्यावर मोहोर उमटवली. परिणामी पिंपरी-चिंचवड पालिकेची निवडणूक (PCMC Election 2022) पुढे जाईल, अशीच चिन्हे आहेत. तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) व आता कॉंग्रेसनेही (Congress) या निवडणुकीची तयारी सुरु केली असून इच्छूकांकडून अर्ज मागवले आहेत. दुसरीकडे भाजप, (BJP & Shivsena) शिवसेना आणि मनसेत या आघाडीवर अद्याप सामसूम आहे.

ओबीसी आऱक्षणाच्या तिढ्यामुळे लांबलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक वेळेत न झाल्याने तेथे १३ मार्चपासून प्रशासक नियुक्तीचा आदेश राज्य सरकारने नुकताच (ता.४ मार्च) काढला. त्यामुळे किमान काही कालावधीसाठी ही निवडणूक लांबणीवर जाणार आहे. ती केंव्हा होणार हे निश्चीत नाही. तरीही राष्ट्रवादीने, मात्र शहरातील सर्वच्या सर्व ४६ प्रभागातून १३९ जागांसाठी इच्छूकांकडून सोमवारपासून (ता.७ मार्च) अर्ज मागवले आहेत. त्यानंतर तूर्त स्वबळाच्या तयारीतील कॉंग्रेसनेही या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनीही येत्या मंगळवारपासून (ता.८ मार्च) म्हणजे महिला दिनापासून आपल्या इच्छूकांकडूनही अर्ज मागवले आहेत. शहर पक्ष कार्यालयात इच्छुकांनी परिचय पत्र, कार्य अहवाल आणि फोटोसह दोन प्रतीमध्ये अर्ज करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडल्याने अनेक इच्छूकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुका काही महिने पुढे जातील, असे सांगितले असले तरी अद्याप यावर निवडणूक आयोगाकडून याबाबत स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. मात्र, पिंपरी राष्ट्रवादीकडून उद्यापासून अर्ज मागवण्यात येत आहेत. आता त्याच मार्गाने काँग्रेसनेही जात इच्छूकांचे अर्ज मागवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT