MPSC Exam
MPSC Exam Sarkarnama
पुणे

MPSC मार्फत २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच होणार ‘सब रजिस्ट्रार’ची भरती

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ८ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे आयोगाच्या माध्यमातून १९९४ नंतर पहिल्यांदाच दुय्यम निबंधक (Sub Ragistrar) या पदाची भरती केली जाणार आहे.

सब रजिस्ट्रार या संवर्गाची ७८ पदे भरली जाणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाच्या ४२ जागा राज्य कर निरीक्षक पदाच्या ७७ तर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ६०३ जागा भरल्या जाणार आहेत. परीक्षेसाठी राज्यातून लाखो विद्यार्थी बसत असतात. १५ जून ते १५ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी २०२० मध्ये ८०७ जागा, २०२१ मध्ये एक हजार 85 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. यावर्षी पदांची संख्या यापेक्षा जास्त असावी, अशी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात सुमारे आठशे जागांसाठी ही जाहिरात काढण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात परीक्षेचे वेळापत्रक बिघडले होते. गेल्या वर्षभरात पूर्ववत होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रकदेखील आता सुरळीत झाले आहे. येत्या काळात आयोगाचा कारभार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अधिक काटेकोरपणे व्हावा. आयोगाच्या सदस्यांची नेमणूक वेळेत व्हावी, अशी अपेक्षा परीक्षार्थी विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT