Digambar Bhegade Sarkarnama
पुणे

Digambar bhegade : भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Digambar bhegade : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला राहिलेल्या मावळ मतदारसंघातून १९९९ व २००४ अशा दोनवेळा भाजपच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला होता.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे (Bjp) माजी आमदार दिगंबर भेगडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 75 वर्षांचे होते. त्यांनी १९९९ व २००४ अशा दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला राहिलेल्या मावळ मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. (Former BJP MLA Digambar Bhegade passed away due to heartattack)

दिगंबर भेगडे यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ आहे. त्यांनी मावळ पंचायत समितीच्या उपसभापतीसह भाजप पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केलं होतं. भाजप तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील भेगडे यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. तसेच सांप्रदायिक क्षेत्रात कार्यरत राहिल्याने पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी अशी घोषणा त्यावेळी गाजली होती. ते बैलगाडाप्रेमी म्हणून देखील त्यांची मावळ तालुक्यात प्रचलित होते. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे यांचे ते बंधू तर भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे ते चुलते होते.

माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT