Sharad Pawar-Ramesh Thorath
Sharad Pawar-Ramesh Thorath Sarkarnama
पुणे

माझ्या निवेदनानंतर पवारसाहेबांनी सूत्रे हलवली अन्‌ वीजजोड तोडणी थांबली : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा दावा

हितेंद्र गद्रे

यवत (जि. पुणे) : ‘‘थकीत वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडीत करण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरत चालली होती. शेतकऱ्यांचा हा संताप आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यापुढे मांडला. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यावर तातडीने सूत्रे हलवत पवार यांनी वीजबिलाच्या प्रश्नावर तोडगा काढला. त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत आहे,’’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (ramesh thorath) यांनी केला आहे. (Former MLA Ramesh Thorat meet Sharad Pawar regarding electricity bill)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात माजी आमदार थोरात यांनी म्हटले आहे की, दौंड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. कोरोना महामारीपासून शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. कर्जवसुलीमुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे, त्यामुळे वीज भरण्यासाठी त्यांच्याकडे सध्या पैसा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत शेतीपंपांचे वीजजोड तत्काळ पुन्हा जोडून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व इतर संबंधितांच्या ही बाब लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

आपण दिलेल्या या निवेदनाची शरद पवार यांनी त्वरीत दखल घेऊन सूत्रे हलवली आणि शेतीपंपांचे वीजजोड पूर्ववत जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला, असा दावाही माजी आमदार रमेश थोरात यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन मदत करण्याची वेळ आल्यास आंदोलन करण्याचीही आपली तयारी असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT