Savitri Nimhan
Savitri Nimhan Sarkarnama
पुणे

माजी आमदार विनायक निम्हण यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचे निधन!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यातील शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. आता त्यांच्या मातोश्री सावित्री महादेव निम्हण यांचेही आज निधन झाले, विनायक निम्हण यांच्या निधनाच्या २० दिवसांच्या आतच आज शनिवारी (ता. १९) त्यांच्या मातोश्रींचं निधन झाले आहे.

विनायक निम्हण यांचे निधन २६ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयातच ह्‌दयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. विनायक निम्हण यांच्या निधनामुळे ऐन दिवाळीसणात निम्हण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे निम्हण कुंटुंबियांवर दुहेरी आघात झाला.

निम्हण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा, तर काँग्रेसकडून एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. ते सध्या शिवसेनेत होते. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. विनायक निम्हण यांच्या मातोश्रींवर रविवारी (ता. २०) सकाळी १० वाजता पाषाण वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT