Shivajirao Adhalarao Patil News Sarkarnama
पुणे

Shirur Politics : लोकसभेचे तिकिट मिळेल की नाही ; मिळाले, तर ते कुणाचे ? उमेदवारीविषयी आढळराव संभ्रमात...

Shirur News : नव्या राजकीय समीकरणामुळे निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण दीड महिन्यानंतरही कायम आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Shivajirao Adhalarao Patil News : अगोदरच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (NCP) अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारामध्ये सामील झाल्याने अनेक नेत्यांची गोची व कोंडी झाली आहे. त्यातून अनेकांचा आगामी निवडणुकीतील पत्ता कट होणार असून त्यांना पर्याय शोधावा लागणार आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण दीड महिन्यानंतरही कायम आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी आला.

खासदारकीची हॅटट्रिक केलेले शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adharao Patil) हे शिरूरमधून २०२४ ला पुन्हा लढणार हे गेल्या महिन्यात २ जुलैपर्यंत नक्की होते. मात्र, अजित पवार गट महायुतीत आला, अन् शिरुरचेही आगामी लोकसभेचे समीकरण बदलले. तेथून आता महायुतीकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव पुढे आले आहे. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी हे शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे शिरुरचे विद्यमान डॉ. अमोल कोल्हे हे आघाडीकडून असण्याची दाट शक्यता आहे.

कारण खुद्द शरद पवार यांनी कोल्हेंना ग्रीन सिग्नल दिला आहे. दरम्यान, या बदललेल्या समीकरणामुळे आढळरावांची महायुतीची उमेदवारी काहीशी डळमळीत झाली आहे. ते काल त्यांच्या बोलण्यातूनही जाणवले. आढळरावांनी 'डीपीडीसी'कडून मंजूर करून आणून आलेल्या विकासकामांचे भुमीपूजन काल खेड तालुक्यातील पूर्व पट्यात झाले. यावेळी खंडोबाचे निमगाव आणि दावडी येथे त्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर तेथे केलेल्या भाषणात उमेदवारीवरून आपण कन्फूज झालो असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या तिकिट मिळेल की नाही, हे माहित नाही आणि मिळाले, तर ते कुणाचे असेल, असे ते म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. पण, या नंतरच्या गोष्टी आहेत, असे सांगत त्यांनी तिकिटाची आशा, काय सोडली नाही. त्यातूनच जनतेच्या आशिवार्दामुळे पुन्हा खासदार झालो, तर आनंदच आहे. मात्र, नाही झालो, तरी हरकत नाही. खासदारकी महत्वाची नाही, तर तुमचा आशिर्वाद महत्वाचा आहे, असे ते म्हणाले.

राजकारणात कुणीही गॉडफादर नसताना खेडच्या जनतेमुळे आपण तीनवेळा खासदार झालो. जनताच आपली गॉडफादर होती, असे आढळराव म्हणाले. त्याच जनतेसाठी उद्या दुसऱ्या कुणाचे काम करायला सांगितले, तर ते ही करु, असे त्यांनी सूचित केले.आघाडीत असताना ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल, हे माहित असतानाही जनतेसाठी काम करीत राहिलो. खासदारकीची अपेक्षा धरून ते केले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खेडचे स्वर्गीय आमदार नारायण पवार यांच्यामुळे आपल्याला २००४ च्या पहिल्या निवडणुकीत खेडमधून तीस हजार मतांचे लीड मिळाल्याची आठवण त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT