Ashok Tekwade on Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ashok Tekwade on Ajit Pawar: भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेले माजी आमदार टेकवडे म्हणतात, अजितदादांविषयी आदरच; पण...

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे गुरवारी (दि.18 मे) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

माजी आमदार अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय का घेतला? अशोक टेकवडे राष्ट्रवादीवर नाराज होते का? असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक टेकवडे यांनी एका वाहिनीशी बोलताना या सर्व विषयावर भाष्य केलं आहे. आपण भाजप प्रवेश करत असलो तरी अजितदादांना झुकूनच नमस्कार करणार असल्याचं अशोक टेकवडे यांनी म्हटलं आहे.

तुमची नाराजी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या कानावर घातली होती का? या प्रश्नावर उत्तर देताना टेकवडे म्हणाले, "अजितदादा यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. ते माझ्यासाठी कुटुंब प्रमुख होते. आताही अजितदादा मला कुठे भेटले तर मी त्यांना झुकूनच नमस्कार करणार आहे.

मात्र, मला ज्या पद्धतीने पक्षातील कार्यक्रमापासून बाजूला ठेवण्यात आले, त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता बस झालं. जवळपास 14 वर्ष वनवास सहन केला. आम्ही वाट पाहत होतो की पक्ष काही जबाबदारी देईल, मात्र, तसं काहीही झालं नाही", अशी खंत यावेळी टेकवडेंनी व्यक्त केली.

तुमच्यावर कोणाकडून अन्याय झाला का? या प्रश्नावर बोलताना टेकवडे म्हणाले, "पक्षात असताना फक्त माझ्यावर अन्याय झाला नाही तर मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांवरही अन्याय झाला आहे. पण मी पक्ष सोडत असलो तरी कुणाबद्दलही चुकीचं बोलणार नाही", असंही ते यावेळी म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT