मंत्रालय  सरकारनामा
पुणे

आरोग्य विभाग परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सोमवारी रात्री आणखी चार जणांना अटक

भरती प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्यात सरकारला अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने सोमवारी रात्री आणखी 4 जणांना अटक केली. या प्रकरणात आत्तापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या दहावर गेली आहे. सायबर पोलिसांनी औरंगाबाद, बीड, लातूर अशा वेगवेगळ्या भागातून आरोपींना अटक केली आहे.

सायबर पोलिसांनी शनिवारी व रविवारी संदीप शामराम गुत्तेकर (वय ३८, रा. बीड रोड, औरंगाबाद) व प्रकाश मिसाळ (वय ४०) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरुन चार जणाना अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी लातूर, औरंगाबाद, बीड येथे कारवाई केली. त्यामध्ये 4 जणांना अटक केली. त्यांना मंगळवारी दुपारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यातील आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांच्या भरतीवर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, भरती प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्यात सरकारला अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. परीक्षेच्या नियोजनातील गोंधळापाठोपाठ आता परीक्षांमधील गैरप्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. या प्रकरणात सुमारे दहा दिवसांपूर्वी एकाला औरंगाबाद येथून अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे.

परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेबाबत सुरवातीपासून आक्षेप घेण्यात येत होते. तरीही त्याच एजन्सीला परीक्षेचे काम देण्यात आले. प्रत्यक्ष परीक्षेचे व्यवस्थापन योग्यरित्या झाले नाही. पेपर फुटल्याने त्या गोंधळात आणखी भर पडली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत. नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र, पेपर फुटीच्या घटनेने या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.राज्य सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या एजन्सीबद्दल या विद्यार्थ्यांच्या मनाता संताप आणि नाराजीची भावना आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT