Online fraud
Online fraud Sarkarnama
पुणे

Online Fraud : लष्करी जवान असल्याचे भासवून फसवणूक; नागरिकांना 'असे' घालायचे गंडा

अक्षता पवार : सरकारनामा ब्यूरो

Pune Crime News : भारतीय सैन्यदलाच्या नावाखाली नागरिकांचे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. देशातील विविध भागात छापे टाकून केलेल्या कारवाईत एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही टोळी 'ऑनलाइन' पद्धतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणातील आरोपी लष्करी जवान Indian Army असल्याचे भासवून नागरिकांचा विश्वास संपादन करीत होती. त्यासाठी ते 'दीपक बजरंग पवार' या नावाने तयार केलेल्या जवानाच्या बनावट ओळखपत्राच्या आधार घेत होती. ही टोळीतील आरोपी ऑनलाइन पद्धतीने भाडेतत्त्वावर घर घेणाऱ्या व्यक्ती आणि इतर संकेतस्थळांद्वारे नागरिकांची फसवणूक करत होते. दरम्यान, भारतीय सैन्यदलाच्या नावाखाली नागरिकांचे फसवणूक होत असल्याची माहिती लष्करी गुप्तचर विभागाकडे आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भरतपूर येथून संजीव कुमार (वय ३०) या कुख्यात Cyber Crime सायबर चोरट्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पुणे (Pune Police), हरियाणा, उत्तर प्रदेश आणि, राजस्थान पोलीस व लष्कराच्या गुप्‍तचर विभाग हे संयुक्तपणे तपास करीत होते. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मेवात, नूह आणि डीग परिसरात छापे टाकले. या कारवाईत आणखी नऊ सायबर गुन्हेगारांना अटक केली. या टोळीत एक्सपर्ट सायबर गुन्हेगारांचा समावेश असून ते गेल्या काही वर्षांपासून गुन्हे करत आहेत. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

या आरोपींकडून आतापर्यंत अनेक बनावट लष्करी ओळखपत्र, कॅन्टीन स्मार्ट कार्ड, पॅन व आधार कार्ड, तीन डझनहून अधिक मोबाईल, २०६ सीम कार्ड आणि सात लॅपटॉप जप्त केले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये ही टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे. टोळीने आतापर्यंत ६०हून अधिक नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

'अशी' होती फसवणुकीची पद्धत

आरोपी मालमत्ता भाड्याने किंवा काही वस्तू खरेदी करण्याच्या व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी नागरिकांकडून काही शुल्क आकारत होते. या प्रक्रियेदरम्यान ते काही तांत्रिक समस्या निर्माण करत आणि नागरिकांकडून ओटीपी किंवा क्यूआर कोड शेअर करण्याची विनंती करून त्याद्वारे नागरिकांच्या खात्यातून पैसे काढत होते.

पोलिसांचीही दमछाक

आरोप अटक टाळण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या ट्राय जंक्शनवरून ऑपरेट केलेल्या मॉड्यूलचा वापर करत होते. गुन्हेगारी कार्यक्षेत्रातील गुंतागुंत निर्माण करण्यासाठी ते वेगवेगळे सीमकार्ड आणि मोबाईल फोन आणि बँक खाती वापरत होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखरे या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT