Pune News, 27 May : पुण्यातून 'ड्रग्ज'चे रॅकेट चालवले गेले, कल्याणनगरमधील अपघातानं Pune Accident Porsche) बेकायदा पब, बार ढाबे थाटल्याचे उघड झाले. या पब, ढाबेवाल्यांकडून 'एक्साइज'चे अधिकारी महिन्याकाठी कोट्यवधींची वसुली करीत असल्याचा आरोप पुढे आला... अशा घटनांनी पुणे दिवसागणिक हदरत असतानाच, पोलिसांच्या 'क्राइम ब्रँच'च्या नावाने बनावट फोनाफोनी करणारी टोळी आता पुण्यात धुमाकूळ घालत असल्याचे उघडकीस आले आहे. अपघात प्रकरणात पोलिस अडकले असतानाच, तोतया अधिकाऱ्यांच्या फोनाफोनीमुळे पोलिसांचे 'टेन्शन' वाढणार आहे.
दुसरीकडे, मुलीच्या अटकेसाठी फोन केल्याचे सांगत पोलिसी खाक्यात रुबाब झडणाऱ्या 'डीसीपी'ची नव्या पेठेतील व्यक्तीने (पालक) उलट तपासणी केली; तेव्हा बनाव करणाऱ्या 'डीसीपी'ची भंबेरी उडाली. या प्रकरणात आता पोलिस लक्ष घालून तपास करण्याची चिन्हे आहेत. एक-दोन नव्हे; तर अशा घटना वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे पुणेकरांची झोप उडत आहे. अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याच्या घटनेनं पोलिस 'टार्गेट' झाले. या घटनेत रोज नवे वाद पुढे येऊ लागल्याने पोलिस यंत्रणाही हदरली आहे. त्याचे पडसाद राज्य आणि देशपातळीरही उमटू लागले असतानाच, पुणे पोलिसांच्या 'क्राइम ब्रँच'मधून बोलत असल्याचे सांगून काहीजण पुणेकरांना फोन करीत असल्याच्या घटना घडत आहेत.
गंभीर म्हणजे, पालकांसोबत मोबाईलवर संपर्क करीत, मुलीला किंवा मुलाला अटक करीत असल्याचे सांगत आहेत. अशा फोन साहजिकच पालकांमध्ये घबराट पसरून, काहीजण तोतया अधिकाऱ्यांच्या पैशांच्या मागणीला बळी पडण्याचीही भीती आहे.
या प्रकारात जाणीवपूर्वक घरातील विशिष्ट व्यक्तीला फोन करून, मुलांच्या अटकेची भीती दाखवली जात आहे. त्यात काही पालक फसण्याची चिंता असतानाच, नव्या पेठेतील एका व्यक्तीला सोमवारी दुपारी 12 वाजता फोन आला.
त्यात 'तुमच्या मुलीला अटक करीत असल्याचे संबंधित तोतया अधिकाऱ्याने सांगून टाकले. त्यानंतर काही क्षणात आपली मुलगी नेमकी कुठे आहे, याची खातरजमा करण्यात आली. ती तिच्या कॉलेजमध्ये परीक्षा देत असल्याचे स्पष्ट होताच, या व्यक्तीने उलट फोन फिरवली आणि बनावट 'डीसीपी'चीच झडती घेतली.
त्यानंतर पुढचा फोन बंद झाला. तो 'स्विच ऑफ' ही करण्यात आला. याआधीही गेल्या काही दिवसांत अशा प्रकारचे फोन येत असल्याच्या तक्रारी आहेत. कल्याणनगरमधील अपघाताने पुणेकरांच्या सुरक्षिततेचे ढीगभर प्रश्न पुढे येत असतानाच, अशा फोन कॉलमुळेही पुणेकरांची चिंता वाढली आणि पुणे पोलिसांची डोकेदुखीत भर पडत असल्याचे दिसत आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.