Agriculture in Maharashtra
Agriculture in Maharashtra Sarkarnama
पुणे

कृषी सचिवांपासून कृषी सहायकांपर्यंत सर्वजण जाणार शेतकऱ्याच्या बांधावर !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपुष्टात आणण्याबरोबरच त्याची कारणे शोधून शेतीविषयक धोरणात आवश्‍यक बदल करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे. राज्याच्या कृषी सचिवांपासून तालुक्यातील मंडल कृषी आधिकाऱ्यांपर्यंत प्रशासनातील सर्व घटक या मोहिमेत सहभागी होणार आहे. येत्या एक सप्टेबरला सरू होणारी ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ ही मोहीम तब्बल दोन महिने चालणार आहे. (One day For My Farmer)

या मोहिमेत कर्जबाजारी आणि नैराश्‍याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारी अधिकारी गावा-गावांत जाऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांना भेटणार आहेत.शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्‍य आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्त्यांची कारणमीमांसा करता यावी. त्या माध्यमातून सुलभ व प्रभावी कृषिविषयक धोरण तयार करता यावे, हा या उपक्रमाच्या अंमलबजावणीमागचा सरकारचा उद्देश असल्याचे कृषी विभागातील आधिकाऱ्यांनी सांगितले.

या उपकमात कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी संचालक, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी विद्यापीठांतील सर्व विभागांचे प्रमुख, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रांताधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी व मंडल कृषी आधिकारी यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

गावभेटीसाठीची जिल्हानिहाय, तालुकानिहाय गावे निश्‍चित करणार.दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू, आदिवासी गावांना प्राधान्य देणार.अधिकारी जिरायती शेतकऱ्यांना प्राधान्याने भेटणार.गावातील सर्व सरकारी, निमसरकारी, खासगी संस्था, गावातील बॅंका, सोसायटी, दूध संस्थांना भेटी देणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT