Pune Corporation-Prashant Jagtap Sarkarnama
पुणे

Pune Corporation Budget : पुणे पालिकेच्या अर्थसंकल्पातून भाजपचे माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना निधी; चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानावर महाआघाडीच्या नेत्यांचा आक्षेप

Mahavikas Aghadi Allegation : पुणे महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्यानंतर पुणे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मागील दोन वर्षे अर्थसंकल्प सादर करीत आहेत. त्यानुसार यावर्षीही आयुक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Sudesh Mitkar

Pune, 18 February : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. हे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त भाजपच्या दबावाखाली बनवत आहे. त्या अंदाजपत्रकातून भाजपच्या माजी नगरसेवकांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पुण्यातील शहराध्यक्षांची नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, वसंत मोरे, सचिन दोडके, अशोक हरणावळ, किशोर कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी एकत्रिपणे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, पुणे महापालिका सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर पुणे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मागील दोन वर्षे अर्थसंकल्प सादर करीत आहेत. त्यानुसार यावर्षीही आयुक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

नियमानुसार शहरातील विविध भागातील गरजेनुसार अत्यावश्यक बाबींची तरतूद होणे आवश्यक आहे. असे असताना मागील ४ दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांनी हे बजेट त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या सूचनेनुसार भाजप कार्यकर्त्यांच्या व माजी नगरसेवकांच्या मागण्या मान्य करीत आगामी बजेट आपल्या प्रभावाचे असणार आहे, अशा प्रकारचे वक्तव्ये केले आहे.

चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य धक्कादायक आहे. त्याचबरोबर पुणे महापालिकेचे नियम व संकेत मोडणारे आहे, असे आमचे मत आहे. पुणे महापालिकेचे आगामी बजेट हे पहिल्यांदाच पुणे महापालिकेत तयार होत नसून पुणे विधानभवनात तयार होत आहे. ही बेकायदा कृती आहे, हे आयुक्तांनी त्वरित थांबवावे अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जगताप यांनी दिला.

पुणे महापालिकेने नियमानुसार शहरातील, समाविष्ट गावांतील, विविध भागातील आवश्यकतेनुसार व शहरातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अर्थसंकल्प केल्यास आमची काहीही हरकत नसेल. पण, भाजपाच्या प्रभावाखाली व मोठमोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प तयार केल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू. याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे. असेही प्रशांत जगताप यांनी नमूद केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT