80-year-old Pune resident Vilas Lele questions Cultural Affairs Minister Ashish Shelar over midnight loudspeaker extension during Ganeshotsav; petitions CJI Bhushan Gavai and CM Devendra Fadnavis. sarkarnama
पुणे

Pune News : "आमच्या झोपेचे खोबरे केलेत"; अस्सल पुणेकर आशिष शेलारांना भिडला, फडणवीस, CJI गवईंनाही मध्ये ओढलं!

Pune News : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरास रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक विलास लेले यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित करून सर्वोच्च न्यायालय व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले.

Sudesh Mitkar

Pune News : राज्य सरकारने गणेशोत्सवात रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी दिली. मात्र, याबाबत आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय का घेतला? असा प्रश्न पुण्यातील 80 वर्षीय विलास लेले यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना विचारला आहे. तसेच, याबाबत उत्तर मिळावे यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतंत्र विनंतीपत्र पाठवले आहे.

शासनाने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन ७ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. शनिवार ३० ऑगस्ट ते शनिवार ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे.

याच आदेशामुळे विलास लेले संतप्त झाले. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, आधीच दहीहंडी उत्सवात आमची स्थिती जगतो की वाचतो अशी होते. अशात आता लेसर दिव्यांची भर पडली आहे. कल्याणकारी राज्य म्हणून या अनिष्ट व उत्सवाशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींना सरकारने आळा घालण्याचे सोडून सरकारच त्याची तरफदारी करते आहे, हे अत्यंत अयोग्य आहे.

कोणीही मागणी केलेली नसताना राज्य सरकारकडून ध्वनिक्षेपकांसाठी ७ दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत आहे. मंत्री शेलार यांनी याचे उत्तर द्यावे. त्यांनी दिले नाही तर त्यांना उत्तर देण्यास भाग पाडावे, अशी मागणी लेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT