Rape Case Sarkarnama
पुणे

पिंपरी-चिंचवड हादरले! अत्याचार, गँगवॉर, आत्महत्येच्या घटनांनी शनिवार ठरला घातवार

`इन्स्टाग्राम`वरील (Instagram) ओळख `एमबीबीएस`चे (MBBS) शिक्षण घेणाऱ्या पुण्यातील एका तरुणीवर बेतली

सरकारनामा ब्युरो

पिंपरी-चिंचवड : सामूहिक बलात्कार, गॅंगवार आणि आत्महत्या या तीन घटनांनी आज पिंपरी-चिंचवड (Pimpri-chinchwad) शहर हादरले. `इन्स्टाग्राम`वरील ओळख `एमबीबीएस`चे (MBBS) शिक्षण घेणाऱ्या पुण्यातील एका तरुणीवर बेतली. या तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार (Gang-Rape) केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी फरार असून २ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी सांगवीतील काटेपुरम चौकात आज सकाळी गोळीबार झाला. या गॅंगवॉरमध्ये (GangWar) एका सराईत गुंड ठार झाला आहे. तर, तिसऱ्या घटनेत वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहाटणी येथे आई-मुलीने आत्महत्या (Suicided) केली.

सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात १९ वर्षीय तरुणीनी फिर्याद दिली आहे. यात प्रथमेश ऊर्फ सनी खैरे (रा. देवकर पार्क, पिंपळे गुरव) हा मुख्य आरोपी फरार झाला आहे. मात्र, स्वराज कदम (वय २०) आणि सौरभ सकपाळ (वय २२,दोघेही रा. पिंपळे गुरव) या अन्य दोघांना अटक केल्याचे तपासाधिकारी कविता रुपनर यांनी `सरकारनामा`ला सांगितले. आरोपींना सोमवारपर्यंत (ता.२०) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी (ता.१८) दिले आहेत. तर सनी खैरे याचा तपास सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयीत तिघेही आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी असून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहेत. यातील सनीची ओळख ही वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणाऱ्या फिर्यादीशी झाली. त्यातून त्याने बुधवारी (दिनांक-१५) रोजी तिला आपल्या घरी बोलवले. तेथे जबरदस्तीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने तिचे काही अश्लिल फोटोही काढले. यानंतर थोड्याच वेळात त्याचा मित्र स्वराज आला. त्यावेळी त्यानेही तिच्यावर शारिरीक अत्याचार केला.

दरम्यान, संबंधित तरुणी पुण्यात तळजाई येथे गेली. यानंतर रात्री १० वाजता तिला पुन्हा संशयित आरोपी सनीने फोन करून तिला घरी बोलवले. तसेच नाही आली, तर तिचे `ते`फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून ती मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा पुण्यातून पिंपळे गुरवला आली. त्यावेळी सौरभने व नंतर सनीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने दोन दिवसांनी पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तेथून हा गुन्हा सांगवीला वर्ग करण्यात आला.

या दरम्यान सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सकाळी टोळीयुद्ध उफाळले. काटेपुरम चौक येथे गोळीबार होऊन त्यात योगेश जगताप हा सराईत गुन्हेगार मारला गेला. प्रतिस्पर्धी गणेश मोटे व त्याच्या साथीदाराने योगेशवर ४ गोळ्या झाडल्या. त्यातील २ वर्मी लागल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला. दत्तजयंतीचा सोहळा त्याने काटेपूरम चौकात आयोजित केला होता. तेथे तो सकाळी साडेदहा वाजता आला. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. त्यातून बचावण्यासाठी तो पळाला. मात्र, पाठलाग करून आरोपींनी पुन्हा त्याच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर एका दुचाकीस्वाराला धमकावून ते त्याच्या बाईकवरून पळून गेले. दरम्यान, या घटनेनंतर सदर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT