Gajanan Marne Sarkarnama
पुणे

Gajanan Marne Gets Bail: कोथरुडमधील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा तुरुंगाबाहेर येणार; 'या' प्रकरणी जामीन मंजूर

Crime News : 2022 मध्ये गजा मारणे याला साताऱ्यातील वाई येथे पुणे पोलिसांनी अटक केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : कोथरूड येथील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मारणे याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने कुख्यात गुंड गजा मारणे(Gajanan Marne) व त्याच्या साथीदारांना अटक केली होती. या प्रकरणी मारणे याच्यासह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी मारणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुंड गजा मारणे याच्यावर कोथरुड, खालापूर, शिरगाव पोलीस ठाण्यात यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी गजा मारणे यांच्या जामिनासाठी न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. त्यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी मारणेविरुद्ध ठोस पुरावा नसल्याचं सांगत या प्रकरणाशी त्याचा थेट संबंध नसल्याचं युक्तिवादात म्हटलं होतं. तसेच मारणे यांचा जामीन अर्ज मंजूर करावा अशी मागणीही केली होती. यावर निकाल देत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मारणे याची सुटका करण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण ?

शेयर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या चार कोटी रुपयांच्या बदल्यात गजा मारणे आणि त्याच्या टोळीनं खंडणी मागितली होती. त्यामध्ये 20 कोटी रुपयांची खंडणीसाठी व्यावसायिकाचं अपहरण करत मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गजा मारणे याच्यासह त्याच्या 14 साथीदारांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. 2022 मध्ये गजा मारणे याला त्यावेळी साताऱ्यातील वाई येथे पुणे पोलिसांनी अटक केली होती.

कोरोना काळात कुख्यात गुंड याची तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावरून पुणे पोलिसांनी मारणे याला चांगलेच रडारवर घेतले होते.मिरवणूक काढल्याप्रकरणी वारजेसह तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गजा उर्फ गजानन मारणे याच्याविरोधात पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

(Edited by Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT