Gangster Nilesh Ghaywal sarkarnama
पुणे

Nilesh Ghaywal Video: पोलिसांचा गुंड निलेश घायवळच्या घरावर छापा, पण 'भाई' इंग्लंडला! दोन अलिशान कार जप्त

Police Raid Nilesh Ghaywal House : कोथरुडमधील गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी निलेश घायवळला अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, तो परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

Roshan More

Nilesh Ghaywal News : काही दिवासांपूर्वी गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार करत एक जणाला गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. निलेश घायवळवर देखील मकोका लावण्यात आला होता. पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या कोथरुडमधील घरावर छापा मारला. मात्र, त्याच्याआधीच तो इंग्लंडला गेल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी घायवळच्या कोथरुडमधली घरातून दोन दुचाकी आणि दोन SUV कार जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या रडावर असल्याने तो अधिच परदेशात पळून गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला नव्हता. त्याचा मुलगा इंग्लंडमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे तेथे गेल्याचे सांगितले जात आहे. लूक आऊट नोटीस त्याला बजावण्यात आली आहे. दरम्यान, तो परदेशातून परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

निलेश घायवळवर हाणामारी, हत्येचा प्रयत्न, हत्या, अपहरणा सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला पासपोर्ट कसा मिळाला याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तो परत आल्यानंतर त्याला अटक करून पासपोर्ट देखील जप्त केला जाईल, असे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.

निलेश घायवळचा हा रेकाॅर्डवरी गु्न्हेगार आहे. तो मुळचा जामखेड तालुक्यातील आहेत. त्याच्या विरोधात तब्बल 24 गुन्हे वेगवगेळ्या पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गुंड गजा मारणेच्या टोळीत तो होता त्याची सुतारवाडी परिसरात मोठी दहशत होती. मारणे टोळीतून बाहेर पडत त्याने आपली टोळी तयार केली. सचिन कुडलेच्या हत्या प्रकरणात तो तुरुंगात होता. 2023 मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला होता.

कोथरुडमधील गोळीबार प्रकरण

17 सप्टेंबरला कोथरुड परिसरात घायवाळ टोळीतील गुंडानी पोलिस ठाण्यापासून पाच ते दहा मिनिटांच्या हाकेवर असलेल्या ठिकाणी किरकोळ कारणावरू गोळीबार करत प्रकाश धुमाळ या नागरिकाला गंभीर जखमी केले होते. त्याच रात्री त्यांनी वैभव साठे या व्यक्तीवर देखील घायवळ टोळीने कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले होते. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी घायवळ टोळीतील गुंड मयूर कंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख यांना अटक केली होती. पोलिसांनी आरोपींच्या तोंडाला काळे कपडे बांधून त्यांची धिंड देखील काढली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT