Manjusha Gaikwad
Manjusha Gaikwad  Sarkarnama
पुणे

Saswad Sarpancha : आनंदाची बातमी : सिंधुताई सपकाळांच्या आश्रमातील मुलगी झाली सरपंच

सरकारनामा ब्युरो

श्रीकृष्ण नेवसे

Manjusha Gaikwad : अनाथांची माय म्हणून देशभर ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलगी कुंभारवळण गावाची सरपंच झाली आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावच्या सरपंचपदी सिंधुताईंची मानस कन्या मंजूषा गोपाळ गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सरपंच मंजूषा गायकवाड यांचा सत्कार केला.

एकीकडे सदस्य पदासाठी गावकी भावकीमध्ये वाद निर्माण होत असतात. तर सरपंच पदासाठी गावात मोठी चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळते. मात्र, कुंभारवळणच्या ग्रामस्थांनी वर्चस्वाला फाटा देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.  कुंभारवळण येथील ‘ममता बाल सदन’ या अनाथ आश्रमात राहिलेल्या मुलीला गावच्या सरपंचपदाचा मान दिल्याबद्दल पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आणि यांनी कुंभारवळण ग्रामस्थांचे आणि लोकशाहीतील त्यांच्या प्रगल्भतेचे कौतुक केले आहे.

या कार्यक्रमात बोलतांना जगताप म्हणाले, 1990 - 91 मध्ये सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ आश्रम कुंभारवळण येथे सुरू केला. त्या आश्रमाला दीपक गायकवाड यांच्या वडिलांच्या नावाने असलेली दोन खोल्यांची जुनी बैठी इमारत मिळाली. परंतु सहा महिने घरात दिवा लावायला सुद्धा शेजारच्या कडून वीज कनेक्शन मिळत नव्हते. त्यामुळे दिवा जळण्याइतके रॉकेल मिळणे मुश्किल होते.

अशा काळात पुढे परिस्थिती सुधारताना 1992 - 93 मध्ये पिण्याचे पाण्याचे नळ कलेक्शन घेण्यासाठी सिंधताई यांनी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांची भेट घेऊन तत्कालीन सरपंच सचिन पठारे यांना सांगून नळ कनेक्शन घेतले. मात्र काळ असा बदलला की.. आता सिंधुताईंच्या मानसकन्येकडे ग्रामपंचायतची सुत्रे आली आहेत.मंजूषा गायकवाड या सिंधुताई यांच्या मानस कन्या आहेतच. तसेच सिंधुताईंचे मानसपुत्र दीपक गायकवाड यांच्या सुनबाई देखील आहेत.

या सत्कारसमारंभावेळी पुरंदर ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष राजवर्धिनी जगताप यांनीही नवनिर्वाचित सरपंच मंजूषा गायकवाड यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सरपंच अश्विनी सतिश खळदकर, सदस्य नंदकुमार कामठे, संदीप कामठे तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश कामठे, सुभाष कुंभारकर, गणेश कामठे, नंदकुमार नेटके, गोपाळ गायकवाड, ज्ञानेश्वर कामठे, संतोष गिरमे, संभाजी जगताप आदीही मान्यवर उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT