Gopichand Padalkar 
पुणे

Yavat Violence: यवतच्या हिंसाचाऱ्याच्या घटनेवर गोपिचंद पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन-तीन महिन्यांपासून...

Yavat Violence: भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्या काल झालेल्या सभेनंतर एकानं फेसबूक आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

Amit Ujagare

Yavat Violence: दौंड तालुक्यातील यवत गावात आज दोन गटात हिंसाचाराची घटना घडली आहे. भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्या काल झालेल्या सभेनंतर एकानं फेसबूक आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या हिंसाचारात दोन गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली.

तसंच काही ठिकाणी टायर जाळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या यवतमध्ये पोलिसांचा कडेकोट पाहारा असून दंगलखोरांना पांगवण्यासाठी त्यांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळं सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे. पण या हिंसाचाराच्या घटनेवर आता गोपिचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पडळकर?

पडळकर म्हणाले, "अत्यंत संतापजनक घटना यवतमध्ये घडली आहे. यवतमध्ये निळकंठेश्वराच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आली होती. याविरोधात काल हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. या मोर्चात सर्वांची हीच मागणी आहे की, पोलिसांनी ओरापींना अटक कराव, त्यानुसार आता त्यांना अटक झालेली आहे.

पण दोन-तीन महिन्यांची परिस्थिती बघितली तर पौड असेल सांगलीतील भवानीपूरमधील घटना, वरंवडमधील महादेवाच्या मुर्तीची विटंबना ही प्रकरणं घडली आहेत. कोणी सामान्य माणसानं ही प्रकरणं केलेली असण्याची शक्यता नाही, तर यामागं षडयंत्र आहे. यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, कारण शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्वांची अस्मिता आहेत. त्यामुळं महाराजांच्या नावाखाली सर्व जातीपातीच्या भिंती बाजुला ठेवून लोक एकत्र येऊ शकतात, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळं या अस्मितेवरच घाला घालायचा आणि आमच्या स्वाभिमानावर घाला घालायचा त्यांचा डाव आहे"

पुतळ्याची विटंबना अन् फेसबूक पोस्टचा संबंध काय?

चार दिवसांपूर्वी यवतमधील निळकंठेश्वर मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एका व्यक्तीनं विटंबना केली होती. त्यामुळं गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळं दौंडसह यवतबंदची हाक ग्रामस्थांनी दिली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोपिचंद पडळकर, संग्राम जगपात आणि स्वामी हेमांगी सखी यांनी या ठिकाणी काल गुरुवारी सभा घेतली. यावेळी त्यांची भाषणंही झाली. त्यांच्या भाषणांनंतर पुन्हा एका व्यक्तीनं त्यावर टिप्पणी करणारी आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केली. या पोस्टमुळं पुन्हा वाद उफाळून आला आणि त्याचं पर्यावसन हिंसाचारात झालं.

यवतमध्ये शुक्रवारी दोन गड एकमेकांविरोधात भिडले त्यांनी तुफान दगडफेक केली. तसंच काही ठिकाणी टायरही जाळले, त्यामुळं यवतमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. पोलिस घटनास्थळी दाखल असून त्यांनी दंगलखोरांना पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. यानंतर परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT