Govinddev Giri Maharaj addressing an event in Pune, cautioning RSS about ideological dilution due to recent political entrants into BJP. Sarkarnama
पुणे

Govinddev Giri Maharaj : आयात केलेल्या नाल्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रदूषित होण्याची शक्यता, सावध व्हावं : गोविंददेव गिरींचा नेतृत्वावर निशाणा

Govinddev Giri Maharaj on RSS : गंगा शुद्ध आहेच पण ती नाल्यांनी प्रदूषित केली. त्याचप्रमाणे संघाच्या कार्याची व्याप्ती वाढल्याने आयात झालेल्या लोकांमुळे संघ प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते, असं वक्तव्य अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केलं आहे.

Jagdish Patil

Pune News, 14 Aug : गंगा शुद्ध आहेच पण ती नाल्यांनी प्रदूषित केली. त्याचप्रमाणे संघाच्या कार्याची व्याप्ती वाढल्याने आयात झालेल्या लोकांमुळे संघ प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते, असं वक्तव्य अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केलं आहे.

गोविंददेव गिरी महाराजांच्या वक्तव्याचा रोख सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर आयारामांवर असल्याचं दिसत आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

यातील काही नेते सुरूवातीपासून भाजप आणि संघाचे कट्टर विरोधक राहिले आहेत. मात्र, राजकीय फायद्यासाठी ते आता भाजपमध्ये येत आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर गोविंददेव गिरी महाराजांनी भाष्य केलं ते पुण्यात 'मृत्युंजय भारत' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, तपाला त्या त्यागाला न्याय द्यायचा असेल तर याच्या पुढचा देश टिकवणं आपली जबाबदारी आहे. हे लक्षात ठेवलं पाहीजे आणि यासाठी संघाने देखील सावध राहण्याची आवशकता मला कधी कधी वाटते.

याचं कारण संघामध्येही संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगवेगळ्या तोंडातून जी आयात केलेली मंडळी येतात. ज्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्यांना कधी संघ आणि हिंदुत्व पटलं नव्हतं ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे देखील कळलं नव्हतं.

अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली आहे. त्यामुळे गंगा तर शुद्धच आहेच पण ती नाल्यांनी प्रदूषित केली त्याचप्रमाणे संघ प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते. त्यामुळे संघाने फार सावध राहण्याची आवश्यकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT