Chandrakant Patil-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Gram panchayat Results : पुण्यात अजितदादांचा करिष्मा चालला; चंद्रकांत पाटलांना धोबीपछाड

Gram panchayat Results : तब्बल 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय

सरकारनामा ब्यूरो

पुण्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील दोन दादांचा चांगलाच दबदबा राहायला आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा अजित पवारांचा करिष्मा चाललेला पाहायला मिळत आहे.

राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले होते. त्यापैकी पुण्यातील 152 जागांसाठी देखील मतदान पार पडले होते. यात आता अजित पवारांचा करिष्मा चालला असल्याचं समोर आलं आहे.

यात तब्बल 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. तर चंद्रकांत पाटील यांना अवघ्या 19 ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच ठाकरे गटाने 8 ग्रामपंचायतींवर तर शिंदे गटाला 1 ग्रामपंचायतींवर यश मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. विकासासाठी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावावर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. सरपंचही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच निवडून आला आहे. फेटरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र खांबलकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमदेवाराचा पराभव केला आहे.

विदर्भ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातही नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा गड आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नागापूरमधून निवडून येतात. त्याच नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे.


सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT