Dilip Mohite-Patil on Sharad Pawar Resignation
Dilip Mohite-Patil on Sharad Pawar Resignation  Sarkarnama
पुणे

Dilip Mohite-Patil on Sharad Pawar: पवारांनी राजीनामा मागे घेतला तर आनंदच; पण पक्षवाढीसाठी इतरांनी काय केलं? मोहित्यांचा निशाणा कुणावर?

रोहिदास गाडगे

Dilip Mohite Patil On Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा नेतृत्व करावं, असा कमिटीचा झालेला निर्णय शरद पवारांनी (Sharad Pawar) स्वीकारला तर आनंदच आहे. पण ज्यांना ज्यांना शरद पवारांनी मोठं केलं, मोठी पदे दिली, मंत्रीपद दिलं, त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली असती तर आज पक्ष मोठा असता, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांनी व्यक्त केलं आहे.

गेल्या २३-२४ वर्षात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेत राहिला. इतक्या वर्षांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मेहनतीतून अनेकांना मोठी पदे मिळाली. पण ज्यांना ज्यांना एवढी मोठी पदं मिळाली, त्यांनी सुद्धा शरद पवार यांच्याइतकीच मेहनत घेतली असती तर आज आमचा पक्षही महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष झाला असता. अशा शब्दांत त्यांनी पक्षातील ज्येष्ठांवरही निशाणा साधला. तसेच, गेल्या २३ वर्षात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे आमचा पक्ष ६०-७० जागांपर्यंत पोहचलो. आमच्या मानाने भाजप आज १०५-१२० जागा मिळवून शकते तर सत्तेत सर्वात जास्त काळ राहुनही आमचा पक्ष का मोठा होऊ शकत नाही. याचाही विचार केला पाहिजे, अशी चिंता व्यक्त केली. (Maharashtra Politics)

शरद पवार यांचं वय पाहता, कोणाला काही बोलून त्यांना दुखावत नाही, पण आज पवार साहेब हे आपले आधारवड आहेत, आधारस्तंभ आहेत. याची जाणीव असू द्या, शरद पवार हेच अध्यक्षपदी राहिले तर चांगलंच आहे, पण आज दुसरी एक शपथ घ्या, शरद पवार यांनी जितकी मेहनत घेतली त्यांच्या इतकीच मेहनत घेऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या नंबरला आणू अशी शपथ घ्या. (Sharad Pawar News)

ज्या ज्या जिल्हांमध्ये आमचे एक एकच आमदार होतात, वीस वीस वर्षे पदावर असतानाही त्यांना दुसरा आमदार निवडून आणता आला नाही. त्यामुळे लोकांनाही संशय येत आहे. पुण्यात अजित पवार यांनी पक्षाला ताकद दिली तिथ आमदाराची संख्या पहा. पण ज्यां आमदारांना त्यांनी ताकद दिली. त्यांच्याकडून पक्ष का वाढत नाही, अशी शंका आम्हाल आहे. बाकीचे आमदार कुणी बोलणार नाहीत पण माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. मी ग्रामपंचायतीपासून इथपर्यंत आलो ते अजित दादा आणि शरद पवार यांच्यामुळे . त्यांच्याप्रेमापोटी मी हे बोलत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT