Haribhau Rathoda
Haribhau Rathoda 
पुणे

Haribhau Rathod News : सात महिन्यांतच हरिभाऊ राठोडांनी आप'ला सोडचिठ्ठी का दिली? 'हे' आहे कारण

उत्तम कुटे: सरकारनामा

Telangana Politics : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या गळाला महाराष्ट्रातील दोन माजी आमदार लागले आहेत. पण, त्यापूर्वीच एका माजी खासदारानेही त्यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या नव्या पक्षात प्रवेश केल्याने महाराष्ट्रात `बीआरएस`ची कार (पक्षाचे निवडणूक चिन्ह) धावू लागली आहे. (Haribhau Rathore gave the reason for leaving AAP within seven months)

यवतमाळचे भाजपचे माजी खासदार,नंतर कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य,त्यानंतर शिवसेना (shivsena) आणि शेवटी `आप` चे प्रदेश उपाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड प्रभारी अशी अस्थिर राजकीय वाटचाल राहिलेले ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सात महिन्यांतच हातातील झाडू खाली टाकत या महिन्यात `बीआरएस`मध्ये प्रवेश केला. त्यांनीच नव्या पक्षाच्या नांदेड येथील सभेनिमित्त सरकारनामाशी बोलताना शेतकऱ्यांचा बीआरएस हा महाराष्ट्रात एक नंबरचा होईल,अशी भविष्यवाणी आज केली.गतवर्षी २१ ऑगस्टला ते शिवसेनेतून `आप`मध्ये आले होते.

अवघ्या सात महिन्यांतच `आप`ला का सोडचिठ्ठी दिली,अशी विचारणा केली असता राठोड म्हणाले, गेल्या महिन्यात झालेल्या चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीची पूर्ण तयारी प्रभारी मी केली होती. एवढेच नाही,तर कसब्यात उमेदवाराने अर्जही भरला होता. मात्र,ऐनवेळी दिल्लीहून निरोप आला अन् उमेदवार मागे घेण्यात आला. त्यामुळे ही आत्महत्या ठरली. त्यानंतर पक्षप्रमुख केजरीवाल हे मुंबईत उद्धव ठाकरेंना भेटले अन सर्व निवडणुकांत विजयी व्हाल असे त्यांना म्हणाले. मुंबई पालिका निवडणुकही लढण्याची तयारी मी केली होती. पण, दुसरीकडे पक्षाचीच निवडणुका लढण्याची तयारी दिसत नसल्याने तो सोडला,असे राठोड म्हणाले.

मंत्रालयातील लेखाधिकारी म्हणून करिअरची सुरवात करणाऱ्या राठोडांनी नंतर गोपीनाथ मुंडे यांचे पीए म्हणून काम केले. तेथेच त्यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला. मुंडेंनी त्यांना थेट खासदारकीचे तिकिट दिले अन ते निवडून आले.मात्र,कॉंग्रेस केंद्रात सत्तेत असताना मनमोहनसिंग यांचे सरकार अल्पमतात आले असताना ते सभागृहात गैरहजर राहिले अन भाजपला तोंडघशी पाडले.त्यातून त्यांना भाजप सोडावा लागला. ते कॉंग्रेसमध्ये आले. तेथे सहा वर्षे विधानपरिषदेवर सदस्य राहिले. २०१९ ला तेथून ते शिवसेनेत गेले. तेथे तीन वर्षे संसार करून ते २०२२ ला `आप`मध्ये आले.तर, नुकतेच `बीआरएस`मध्ये ते दाखल झाले आहेत.हा त्यांचा शेवटचा पक्ष ठरेल,अशी आशा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT