supriya_sule.
supriya_sule. 
पुणे

मी हर्षवर्धन पाटलांना फोन लावला पण संपर्क होत नाही : सुप्रिया सुळे 

अमोल कविटकर

पुणे : "  हर्षवर्धन पाटील यांच्याशी माझी तीन-चार दिवसांपूर्वी भेट झाली होती.  आजही मी त्यांना संपर्क केला, पण कॉल लागत नाहीय," असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले . 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जाहीर सभेत टीका केली . या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या ,म्हणाल्या , " इंदापूरच्या जागेबाबत कोणती चर्चाही झालेली नाही, त्यामुळे आश्चर्यही वाटलं आणि वाईटही. त्यांच्यासाठी जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिलाय.  कौटुंबिक संबंध असतानाही त्यांनी एवढ्या टोकाची भूमिका घेतली याचं दुःख झालं. " 

" इंदापूरबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची टोकाची भूमिका नाही . २८८ जागांची यादी  दोन्ही पक्षाकडे आहे, पण यादीत नाव आलं म्हणजे जागा अंतिम झाली, असे होत नाही. राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपात तथ्य असेल तर माझी चर्चेची तयारी आहे. मी त्यांना संपर्क करतच आहे. निवडणूक असो किंवा नसो त्यांच्या गाठीभेटी होत असतात," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT