Harshvardhan Patil, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Lok Sabha Election: पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे नंतर बघू आधी...

Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील वादावर पडदा टाकण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवारांशी फोनवरून चर्चा केली.

Sudesh Mitkar

Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. महायुतीतील नेत्यांनीच एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे पवार कुटुंबीयांना आव्हान देत माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे इंदापूरमधून विधानसभेचा शब्द घेतल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, असा पवित्रा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे बारामतीतील हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावरती खलबतं सुरू होती. फडणवीस यांनी वादावरती पडदा टाकण्यासाठी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात इंदापूर (Indapur) येथे मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित कार्यकर्त्यांशी संवाद साधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसंच हर्षवर्धन पाटील यांच्यावर बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार करताना दिसतील. एकूणच ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना समजदेखील दिल्याचं बोललं जात आहे. विधानसभेबाबतच्या शब्दासाठी आडलेल्या हर्षवर्धन पाटलांना "विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा," असे आदेश दिले आहेत.

बारामती मतदारसंघामधून (Baramati) महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं काम करा . विरोधात कोणताही प्रचार करू नका आणि समर्थकांनाही तशी समज द्या; असे आदेश फडणवीसांनी पाटलांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत योग्य ती कारवाई करू, असे आश्वासनदेखील देवेंद्र फडणवीसांनी दिलं असल्याचं बोललं जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT