ajit pawar harshvardhan patil devendra fadnavis sarkarnama
पुणे

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी अजितदादा अन् फडणवीसांच्या चर्चेतला 'तो' तपशील सांगितला; "मी विधानसभेत नको म्हणून.."

Harshvardhan Patil News : "लोकसभेला आमची ताकद अधिक असल्याचं काहींना वाटतं. मात्र, विधानसभेला आम्ही नको होतो," अशी खंत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Akshay Sabale

आम्ही सुरूवातीला लोकसभेला शरद पवारसाहेबांना मदत केली. तीनवेळा सुप्रियाताई सुळे यांना मदत केली. आताच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांनाही मदत केली. पण, आम्ही फक्त लोकसभेला मदतच करायची का? तसेच, तीन महिन्यानंतर विधानसभेला आम्ही नको, अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे, असं मत माजी मंत्री, भाजप नेते, हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते 'एपीबी माझा'शी संवाद साधत होते.

लोकसभेपूर्वी अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात इंदापूरच्या जागेवरून झालेल्या चर्चेतील तपशीलही हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांनी सांगितला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात इंदापूरवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "लोकसभेवेळी देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार ( Ajit Pawar ) आणि माझ्यात चर्चा झाली होती. तेव्हा, 'इंदापूरबाबत तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य आहे. त्यास माझा पाठिंबा राहिल,' असा शब्द अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता. त्यानंतर 'इंदापूरचा निर्णय मी घेणार. तो मान्य करावा लागेल,' असं फडणवीसांनी अजितदादांना सांगितलं होतं."

"नंतर झालेल्या प्रचासभांच्या भाषणांत अजितदादांनी हेच म्हटलं होतं. त्यासह फडणवीसांनी इंदापूर आणि मुंबईत तेच सांगितलं होतं. पण, अजून महायुतीच्या जागावाटपाची चर्चा होत आहे. इंदापूरची जागा कोणत्या पक्षाला जाते, यावर अजून बरीच चर्चा बाकी आहे. जे ठरलं होतं, त्यानुसार आमचे नेते निर्णय घेतील," असं म्हणत एकप्रकारचे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरची जागा भाजपला मिळणार असल्याचा विश्वास एकप्रकारचे व्यक्त केला आहे.

"आम्ही सुरूवातीला लोकसभेला शरद पवारसाहेबांना मदत केली. तीनवेळा सुप्रियाताई सुळे यांना मदत केली. आताच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांनाही मदत केली. पण, आम्ही फक्त लोकसभेला मदतच करायची का? लोकसभेला आमची ताकद अधिक असल्याचं काहींना वाटतं. मात्र, विधानसभेला आम्ही नको होतो. त्यामुळे तीन महिन्यांत असं काय होते? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे," असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.

"कदाचित मी विधानसभेत नको म्हणून राजकीय आराखडे बांधले जात असतील. परंतु, मी चांगला नाही, तर आमची मदत का लागते? अशा प्रकारचा संघर्ष बऱ्याच निवडणुकीपासून सुरू आहे. आम्ही प्रमाणिकपणे मदत करतो. कुणाच्या एक रूपयाच्या मिंद्यात नाही," असं हर्षवर्धन पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT