Harshvardhan Patil Sharad Pawar sarkarnama
पुणे

Indapur Politics: 'झेडपी'साठी 'घड्याळ' चिन्हावर मुलीची उमेदवारी,भरणेंशी हातमिळवणी; हर्षवर्धन पाटील लवकरच राजकीय वाट बदलणार?

Indapur Politics: पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकाच चिन्हावर एकत्रितपणे जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड ही इंदापुरात पाहायला मिळाली.

Deepak Kulkarni

Pune News: इंदापूरच्या राजकारणात एकेकाळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मोठा दबदबा होता. पण 2014 पासून सलग तीन विधानसभा गमावण्याची वेळ आल्यानंतर त्यांच्या राजकारणाला उतरती कळाच लागल्याचं दिसून आलं. कधी भाजप,कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षात एन्ट्री, एव्हाना नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तर कहर म्हणजे इंदापुरात प्रदीप गारटकर यांनी बंडखोरी करत अजित पवारांना आव्हान निर्माण दिल्यानंतर हर्षवर्धन पाटील,प्रवीण मानेंनी त्यांना साथ दिली होती.

असे एकापेक्षा एक वेगवेगळे डाव टाकूनही पदरी निराशाच आल्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये कट्ट्रर राजकीय विरोधक राहिलेल्या राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंशी हातमिळवणी केली आहे. यानंतर त्यांनी लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकाच चिन्हावर एकत्रितपणे जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड ही इंदापुरात पाहायला मिळाली. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या मंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते हातात हात घालून एकत्र आल्याचे दिसून येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील या पुन्हा एकदा तर दुसरीकडे दत्तात्रय भरणेंचा (Dattatray Bharne) मुलगाही जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरला आहे. या सगळ्या घडामोडींनंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणेंनी आपलं विरोधाचं राजकारण आता विकासाच्या वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांनी काही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासह मोठ्या राजकीय घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं. तो निर्णय हा पक्ष नेतृत्वाचा असणार असून राज्यात सध्यातरी महायुती आहे. त्या महायुतीचे आम्ही भाग आहोत, असं स्पष्ट करत हर्षवर्धन पाटील यांनी आगामी काळात त्यांच्या नव्या राजकीय वाटचालीचे संकेत तर दिले नाहीत ना अशी चर्चा इंदापुराच्या राजकारणात सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या आता फक्त पुणे जिल्हाच नाही, तर राज्यातही अनेक ठिकाणी एकत्र आल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. सध्या आपण आणि भरणे एकत्र आलो असून पुढे राजकारणात काय होईल हे सांगता येत नसल्याचं म्हणत राजकीय गुगलीही पाटील यांनी टाकली आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले,आम्ही दोघे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकत्र आलो आहोत. हा निर्णय शरद पवार,अजित पवार,सुप्रिया सुळे यांनी मिळून घेतला आहे. त्यांचे आदेश आले ते आम्ही मान्य केल्याचंही त्यांनी आवर्जून यावेळी सांगितलं. आमच्यातल्या संघर्षाचा त्रास कार्यकर्त्याला होतो. त्यामुळे हे कुठे तरी थांबायला पाहिजे होतं अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेला एकाच चिन्हावर लढायचं आहे असा निर्णय आमचे नेते शरद पवार यांनी निर्णय घेतला. त्या निर्णयाचं पालन बंधनकारक आहे. याचवेळी तसाच आदेश हा अजित पवारांनी दत्ता भरणेमामांनाही दिला. त्यांनीही तो मान्य केल्यामुळे आम्ही दोघेही एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT