Rain updates in Pune
Rain updates in Pune sarkarnama
पुणे

Maharashtra Rain News : पुण्यासह सातारा-कोल्हापूरला पुढील चार दिवस अतिवृष्टीचे !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यासह (Rain updates in Pune) सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पुढील ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात या सर्व जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

सलग चार-पाच दिवसांपासून पुणे परिसरात पाऊस सुरू असून कालपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. संततधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले,‘‘ हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गुरुवारी शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल. शुक्रवारी शाळा सुट्टी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारी आढावा घेऊन घेतला जाईल.’’

मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी ही विलंब होत आहे. अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT