Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : बारामतीत अजितदादांना प्रथमच प्रचंड सुरक्षा....; कारण काय?

Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते आज बारामती दौऱ्यावर होते.

मिलिंद संगई, बारामती

Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानासमोर तसेच शहरात झालेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) आज (ता. ७) बारामतीत (Baramati) कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, कोणताही धोका पत्करायचा नाही, असा निर्णय घेतलेला असल्याने पवार सुरक्षा यंत्रणांच्या गराडयात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवार आज बारामती दौऱ्यावर होते.

दरम्यान, आपल्या परखड शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या अजित पवार यांनी आज बारामतीत माध्यमांशी बोलताना चुकून झालेल्या विधानाचा बाऊ केल्याबद्दल मुद्दा उपस्थित केला. पुण्यात बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुले यांच्या ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला, ही चूक होती, त्या बद्दल मी लगेचच दिलगीरीही व्यक्त केली. मात्र, त्याचा इतका गवगवा करण्याची गरज नव्हती, अशा शब्ंदांत पवार यांनी माध्यमांनाच फटकारले.

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांची एकदिवसांची कार्यशाळा बारामतीत आयोजित करणार असल्याचे सांगत, या निमित्ताने त्यांनाही आपल्या कामाबद्दल सविस्तर माहिती मिळेल, असे ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अजित पवार प्रथमच बारामतीत आले होते. त्या मुळे त्यांना भेटायला सरपंच व सदस्यांनी आज मोठी गर्दी केली होती.

नवीन कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. नवीन लोकांच्या हातात गावचा कारभार गेला पाहिजे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे चांगले निकाल लागले. तालुक्यात दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतात. परंतु गटातटात आम्ही पडत नाही. जो गट निवडून येईल त्यांना मदत करायची गावच्या विकासाला हातभार लावायचा ही ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची शिकवण मी पुढे घेवून जात असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT