MNS Pune Sarkarnama
पुणे

Pune MNS : मुंबई, ठाण्यानंतर पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला अन् मनसैनिकांनी टीम लीडरला धु धु धुतला!

Hindi Marathi Dispute in Pune : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद रंगताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला मराठी अ मराठीवरून मुंबईमध्ये दोन शेजाऱ्यांची झालेली भांडणं चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर ठाण्यातही असाच काहीसा हिंदी मराठीवाद पाहायला मिळाला.

Sudesh Mitkar

Pune News, 04 Jan : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद रंगताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला मराठी अ मराठीवरून मुंबईमध्ये (Mumbai) दोन शेजाऱ्यांची झालेली भांडणं चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर ठाण्यातही असाच काहीसा हिंदी मराठीवाद पाहायला मिळाला.

यानंतर आता पुण्यात (Pune) हिंदी-मराठी वाद रंगला आहे. तर या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोलायचं नाही, जर मराठी बोलला तर कामावरून काढून टाकेनस अशी दमबाजी टेलिफोन कंपनीचा टीम लीडर करत होता.

याबाबत मनसेकडे (MNS) संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर या टीम लीडरला मनसेने चोप दिला आहे. मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टीम लीडरला मनसे स्टाईलने चोप देण्यात आला आहे. शाहबाज अहमद हा त्याच्या अंडर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंदू सणांना सुट्टी देत नव्हता.

तसेच गेले 3 महिने सदर मराठी पोरांचा त्याने पगार देखील केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची या कामगारांनी मनसेकडे तक्रार केल्यानुसार, आमचा पगार थांबवल्यामुळे त्याने आम्हाला धमकावलं. शाहबाज म्हणाला, 'कोनसी भी सेना लेके आओ नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय'; अशा भाषेत दमदाटी केल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

या सर्व घटनेनंतर मनसेने टीम लीडरला चोप दिला आणि येत्या सोमवारी सर्वांचे पगार करायला लावले आहेत. अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील 3 संबंधित टेलिकॉम कंपनीची ऑफिस फोडून टाकणार, असा इशारा मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT