devendra fadnavis  sarkarnaam
पुणे

Devendra Fadnavis : आम्ही कुणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो..., फडणवीसांनी कोणाला दिला इशारा?

Jagdish Patil

Pune News : पुण्यातील गुंडांना कोणाचा धाक राहिला आहे का नाही? असा प्रश्न विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.

पुण्यातील कोयचा गँगची दहशत, गाड्या पेटवण्याचे प्रकार आणि आता तर थेट दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत आहेत. वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याच्या खून प्रकरणानंतर आणखी व्यावसायिकावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे पुणे शहरात दहशतीचं वातावरण आहे.

शिवाय या सर्व घटनांचा जबाबदार राज्याच्या गृहखात्याला धरलं जात आहे. अशातच आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या सर्व घटनांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी गुन्हेगारांना सज्जड दम देत इशारा दिला आहे.

"कुठलीही घटना घडली तरी आम्ही कुणाला सोडत नाही. तत्काळ शोधून काढतो, ठोकून काढतो आणि जेलमध्ये टाकतो. त्यामुळे पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत", असं फडणवीस म्हणाले. ते पुण्यात (Pune) माध्यमांशी बोलत होते.

कोल्हापूर ते पुणे या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पुणे स्थानकावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुण्यातील गुन्हेगारीवर भाष्य करतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासाठी वंदे भारत ट्रेनची भेट दिली असून ही अतिशय उत्तम आणि अत्याधुनिक सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन असल्याचं म्हटल. तसंच महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT