Pune news| Shivsena|
Pune news| Shivsena| 
पुणे

नोकरीचा तडकाफडकी राजीनामा : शिवसेनेची गळती रोखण्यासाठी शिक्षकाचे मोठे पाऊल

सरकारनामा ब्युरो

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडली. एवढ्यावरच न थांबता राज्यभरातूनही शिंदे गटाला पाठिंबा वाढत चालला आहे. अशात पक्षाच्या डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कामाला लागले आहे. शिंदे गटाला पाठिंबा वाढत असला तरी दूसरीकडे शिवसेनेलाही पाठिंबा वाढत आहे. अशात पुण्यातील एका शिक्षकाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. दीपक खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिवसेना पक्षसंघटनेचे काम करण्यासाठी आपण स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे खरात यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी २७ जुलै २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्याचे पत्र सध्या सोशल मिडीयावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.

दीपक खरात गेल्या वीस वर्षांपासून म्हणजेच ०१ फेब्रुवारी २००२ पासून वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. वालचंदनगरमधील पाठशाळा क्र. ३ मध्ये ते प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. मात्र राज्यातील सत्तांतर आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारे खरात राज्यतील हा पहिलेच शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे.

विशेष म्हणजे शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनीदेखील नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. गुरुवारी (२८ जुलै) आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, तुमच्या माझ्या जीवनाचा मुळाधार संविधानिक चौकट आहे. ही चौकट उद्वस्त करण्याचा पाश्वी खेळ भाजप करत आहे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग या सारख्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून हा पाश्वी खेळ खेळला जात आहे. ते माझ्या सारख्या संविधान मानणाऱ्या, सजग, संविधान निष्ठ नागरिकाला स्वस्त बसून बघणे अशक्य आहे. त्यामुळे सातत्याने मला विचारले जात आहे की, तुमच्या सारखा पुरोगामी माणूस इकडे कसा काय? ज्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं की, माझे हिंदुत्त्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्त्व नाही. त्याच क्षणी माझ्या बरोबर चांद्यापासून बांध्या पर्यंत जोडलेला मुस्लिम समाज, वंचित बहुजन आघाडीतील अतुल नागरे, राष्ट्रवादीच्या शितल केदारे, भाजपच्या पुण्यातील नगरसेविका किरण जठार आदी जण माझ्यासह शिवसेनेत येण्यास तयार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT