Pune NCP  Sarkarnama
पुणे

Pune APMC Election: गारटकरांच्या निर्णयाला दांगट-पाटलांकडून केराची टोपली; म्हणाले, त्यांना गांभीर्यांने घेत नाही

Pune Market Committee Election: हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर विकास दांगट पाटील यांनी दिली प्रतिक्रिया...

सरकारनामा ब्यूरो

Pune Bazar Samiti Election News: राष्ट्रवादीचे नेते आणि पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून मंगळवारी हकालपट्टी करण्यात आली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विकास दांगट पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम केले. तसेच त्यांनी सर्वपक्षीय पॅनल उभा केल्याप्रकरणी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

विकास दांगट पाटील यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर "आपण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना गांभीर्याने घेत नाही", अशी प्रतिक्रिया त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

विकास दांगट पाटील म्हणाले, "अजितदादा उद्याचे मुख्यमंत्री आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. अध्यक्षांची (जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची) कारवाई आपण गांभीर्याने घेत नाही. आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत. आम्ही निवडून येऊन राष्ट्रवादीतच असणार आहोत. निवडणुकीमुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काहीही झालं तरी आम्हीच निवडून येणार आहोत", असं ते म्हणाले.

विकास दांगट पाटील यांच्या प्रतिक्रियेला प्रतिउत्तर देताना जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी म्हटलं, "मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, जिल्हाध्यक्षाने घेतलेला निर्णय ते गांभीर्याने घेत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे ", असं गारटकर म्हणाले.

दरम्यान, सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण याच निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत सर्वपक्षीय पॅनल उभा केल्याप्रकरणी दांगट पाटील यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे विकास दांगट आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यात आता राजकारण तापलं आहे. (Political Short Videos)

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT