Nilesh Mazire and Vasant More
Nilesh Mazire and Vasant More  Sarkarnama
पुणे

Pune MNS : मलाही वसंत मोरेंची गरज नाही; माझिरे आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

Vasant More News : पुणे मनसेतील (MNS) अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांची मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला.

माझिरे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ते आपल्या पदाधिकाऱ्यांसह मनसेतून बाहेर पडले. माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पण आता मोरे आणि माझिरे यांच्यामध्ये कटुता आली असल्याचं पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माझिरेंची मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर माझिरे यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर केले. यावर बोलताना वसंत मोरे (Vasant More) यांनी माझिरेंनी पक्ष सोडल्यानंतर आपला त्यांच्याशी काही संबंध उरला नाही, असं विधान केलं.

त्यानंतर मोरेंच्या या वक्तव्यावर माझिरेंनी एका वृत्तवाहिनीसी बोलताना 'मलाही वसंत मोरे यांची गरज नाही' असे म्हटले. त्यामुळे आता मोरे आणि माझिरे यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, वसंत मोरे यांच्या नाराजीवर येत्या दोन दिवसात सविस्तर खुलासा केला जाईल, असं मनसे नेते बाबू वागसकर (Babu Wagaskar) यांनी सांगितलंय. त्यामुळे वसंत मोरे यांच्याबाबत पक्ष नेमकं काय निर्णय घेणार? ते येणाऱ्या काही दिवसांत समोर येईल. तसेच मोरे आणि माझिरे यांच्यातही कटुता आल्याने याविषयी दोघांकडूनही यापुढे नेमकं काय भूमिका घेण्यात येईल याबाबत अद्याप तरी स्पष्ट करण्यात आलेलं नाही. (Pune MNS News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT