पुणे : "आघाडी सरकारमध्ये आपल्याला गृहखातं हवं, होतं, पण वरिष्ठांनी ते खातं दिलं नाही," अशी खंत पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. आपल्या मनातली खदखद अजितदादांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. (Ajit Pawar latest news)
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकरणी बैठकीत व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने अजितदादांना सांगितले की, आपलं सरकार आले की तुम्ही गृहखातं घ्या. त्यावर अजितदादांना त्यांना मिश्किलपणे उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले,"पाच वर्षापूर्वी मला उपमुख्यमंत्री केले तेव्हा मी वरिष्ठांना म्हटलं होते की माझ्याकडे गृहखाते द्या.पण वरिष्ठांना वाटलं की याच्याकडे गृहखाते दिले तर आपलं कोण ऐकणार? हे खर आहे की माझ्याकडे गृहखाते दिले तर मला जे योग्य वाटते तेच करणार,"
"सगळ्याचा समान न्याय देतो, राष्ट्रवादीचा जर कोणी चुकला, आणि मला कोणी सांगितले की दादा याला पोटात घ्या. पण मी कुणालाही पोटात घेत नाही. सगळ्यांना नियम सारखेच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी जीवाचं रान करेल, पण चुकला तर, त्यांच्यावर पांघरुन घालणार नाही,"असे पवार यांनी स्पष्ट केलं.
"मी वरिष्ठांकडे गृहखातं मागितले होते. पण ते मिळाले नाही, पहिल्यांदा अनिल देशमुखांना हे खातं मिळालं. त्यांच्याकडून हे गृहखातं गेल्यावर म्हटलं होते की आता तरी द्या. त्यानंतर ते खातं दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेलं. वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर बोलता येत नाही," असे अजित पवार म्हणाले.
विरोधीपक्ष नेते अजित पवार सध्या पुणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघात फिरत आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुरू केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.