पुणे : मी कोणत्याही परिस्थितीत राजकारणात प्रवेश करणार नाही. परंतु सामाजिक कार्य चालूच ठेवणार असून , जमेल तेवढी जनतेची सेवा करणार आहे. असे मत मीरा सुरेश कलमाडी यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी हे सध्या राजकीय विजनवासात आहेत. पुण्यात काॅंग्रेसकडे दुसरा प्रबळ असा चेहरा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाही. कलमाडी यांना मानणारे अनेक कार्यकर्ते काॅंग्रेसमध्ये अजुनही आहेत. त्यात मीरा कलमाडी या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक व्यासपीठावर येणार असल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे काॅंग्रेससाठी त्या संभाव्य उमेदवार असणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर स्वतः मीरा कलमाडी यांनीच पडदा पाडला.
प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिक वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ३१ ओक्टोम्बर ते दिनांक १९ नोव्हेंबर दरम्यानच्या काळात पुणे शहरात १०० ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे १ ,८०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्या संयोजक व कार्यकर्त्यांचा सौ. मीरा कलमाडी यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशन च्या डॉ . नितु मांडके सभागृहात खास सन्मान करण्यात आला .आपले मनोगत व्यक्त करताना सौ. मीरा कलमाडी यांनी आलेल्या सर्व रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, सदानंद शेट्टी आदी ,मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक संजय बालगुडे यांनी केले तर आभार एडविन रॉबर्ट यांनी मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.