Pune Crime News : वादग्रस्त प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या नावे असलेल्या कंपनीवर महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई होणार आहे. परिणामी पूजा खेडकरसह मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण काळात अवास्तव मागण्या केल्याने आयएस पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत. त्यांनी यूपीएससीला सादर केलेल्या कागदपत्रांवरही शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याबाबत समितीद्वारे चौकशी सुरू आहे. मुलीने केलेल्या कारनाम्यानंतर खेडकर कुटुंबाची कुंडलीच बाहेर येऊ लागली.
पुजा यांच्या आई मनोरमा खेडकरने Manorama Khedkar मुळशीतील एका शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांचा पिस्तुलाचा परवानाही रद्द केला आहे. आता मनोरमा यांच्या पिंपरी चिंचवड येथील थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा PCMC कर बुडवल्याचे समोर आले आहे. त्याप्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे. ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे. या कारवाईमुळे मनोरमा यांच्यासह त्यांची मुलगी आयएएस पूजा खेडकर यांच्याही अडचणीत वाढ होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील असलेल्या ज्योतिबानगर तळवडे येथे मनोरमा खेडकर यांची थर्मोव्हेरिटा ही कंपनी आहे. या कंपनीने दोन वर्षांपासून महानगरपालिकेचा कर बुडवला आहे. या कराचा आकडा हा 2 लाख 77 हजार रुपये आहे. यासह खेडकर कुटुंबीयांनी थर्मोव्हेरिटा ही कंपनी रेड झोनमध्ये उभारल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने ही कंपनी आता अनधिकृत असल्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
असा लागला सुगावा
पूजा खेडकर यांनी UPSC कडे अपंगत्वाचे सादर केलेले प्रमाणपत्र पीसीएमसीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून घेतले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या अर्जात याच कंपनीचा पत्ता हा आपले निवासस्थान म्हणून नमूद केला होता. आता या कंपनीने महानगरपालिकेचा कर बुडल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेची ही कंपनी अनधिकृतपणे उभारली असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीवर हतोडा पडल्याची शक्यता असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.