IAS Pooja Khedkar Family Sarkarnama
पुणे

IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; दिलीप खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Police Crime File Against Dilip Khedkar father OF Pooja Khedkar: दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा यांना स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या (Pooja Khedkar) अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी आहे.यापूर्वी पटियाला हाऊसने फेटाळला त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्याविरुध्द गुरुवारी (ता. ८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने खेडकर कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा यांना स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे अहवाल पाठविला होता.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पूजा खेडकर कार्यरत होत्या. त्यावेळी स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. खासगी मोटारीवर अंबर दिवा लावल्याने चर्चेत आल्या होत्या. पूजा यांची वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती.

यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा दिल्ली गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी गुन्हे शाखेने अटक करू नये, यासाठी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

दिल्ली पोलिसात पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे कोट्यवधींची संपत्ती असूनही त्यांनी ओबीसी कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे अपंगत्वाची खोटी कागदपत्रं सादर केल्याचा आरोप आहे. त्यांची लाल बहादूर शास्त्री अकादमीकडून चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण मिळावं, यासाठी पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT