Waris Pathan| AIMIM| 
पुणे

समजा, 'वंदे मातरम्' नाही म्हटलं तर, त्याला गोळी घालणार की फासावर लटकवणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी फोनवर "हॅलो नव्हे- वंदे मातरम्' अभियानाची घोषणा केली होती. याचा अध्यादेश शनिवारी (१ ऑक्टोबर) काढण्यात आला. त्यानंतर आज वर्ध्यातून या नव्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून राज्यात 'हॅलो नव्हे- वंदे मातरम्' (Vande Mataram Mission) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत आता सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोनवर बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वी हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणायचं आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर एमआयएम नेते वारिस पठाण यांनी निशाणा साधला आहे. ''जर कोणी वंदे मातरम् नाही म्हणाले तर काय करणार? गोळी मारणार का? त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? त्याला तुरुंगात टाकणार की त्याला फासावर लटकवणार? हेही भाजप नेत्यांनी सांगावे. संविधानात कुठे वंदे मातरम म्हणायला सांगितले आहे का? असाही सवाल पठाण यांनी उपस्थित केला.

भाजपकडे काही करण्यासारखे काही मुद्देच राहिलेले नाहीत. कधी शहरांची नावं बदलायची तर कधी वंदे मातरम म्हणायला लावायचं. पण हे सर्व काही बेरोजगारी, महागाईवरून लक्ष वळवण्यासाठी नाटकं सुरु आहेत. याना कोणी बेरोजगारी, महागाईवरून प्रश्न विचारले तर चित्यापेक्षाही वेगाने पळून जातील. पण वंदे मातरम् म्हणून काय मिळणार आहे, बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे का? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का? महागाई कमी होणार आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? असा सवालही पठाण यांनी उपस्थित केला. बेरोजगारी, महागाईवर कोणी त्यांच्याशी बोलले तर ते चित्त्यापेक्षा वेगाने पळून जातील, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

भाजपने अभियानाची सुरुवात तरी कोणत्या दिवशी केली आहे तर, महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी. महात्मा गांधी आमच्या देशाचे फादर ऑफ नेशन आहेत, नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. हा गोडसे देशाचा पहिला दहशतवादी होता, त्याची हे सगळे पुजा करतात. 'गोडसे मुर्दाबाद' हे तर त्यांच्या तोंडून कधी निघणारही नाही. पण काहीतरी मुद्दे काढून जनतेचे लक्ष भरकटवायचं आणि द्वेषाचे पसरवायचा, हेच यांचे राजकारण आहे, असाहल्लाबोल वारीस पठाण यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT