Navle Bridge Accident |
Navle Bridge Accident | 
पुणे

Navle Bridge Accident मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश; ट्रकचालकावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

Pune news : नवले पुलाजवळील अपघातप्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. नवले ब्रिजवर टँकरच्या धडकेने झालेल्या अपघाताविषयी एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते तपासण्याचे आणि अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात ट्रकचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक हा उत्तर प्रदेशचा चालक असून सध्या तो फरार असल्याची माहिती मिळाली आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने पुण्यातील (Pune) आज मध्यरात्रीच्या सुमारास (ता. २१) कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात सुमारे ४० ते ४८ गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, नवले ब्रिजवर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. नवले ब्रिजची ओळख सध्या अपघाती ब्रिज होताना दिसत आहे.  गेल्या काही महिन्यांपासून इथे सातत्याने अपघात होत आहेत. ब्रिजवर नेहमीच वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे इथे वाहतुक कोंडीची समस्या ही नेहमीचीच झाली आहे.  या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या मालिकाच सुरु आहेत. आजपर्यंत या ब्रिजवर झालेल्या अपघातांमध्ये शेकडो लोकांना या आपला प्राण गमवावा लागला आहे.

स्थानिकांनी सतत होणाऱ्या या अपघातांमुळे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनेही केली. होमहवन, प्रेतयात्रा अशी प्रतिकात्मक आंदोलने देखील करण्यात आली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे नवले ब्रिजवर अपघातांचे सत्र सुरूच असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT