पुणे सरकारनामा
पुणे

पुण्यात उद्यापासून हॉटेल्स रात्री बारापर्यंत तर दुकाने अकरापर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

या बाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आज काढले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाची लाट कमी होऊ लागली तसे पुण्यातले निर्बंध हळूहळू उठविण्यात येऊ लागले आहेत.उद्यापासून व्यापरी दुकाने रात्री अकरापर्यंत तर हॉटेल्स रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सिनेमा व नाट्यगृहेदेखील २२ ऑक्टोबरपासून पन्नास टक्के क्षमतेने सरू होत आहेत. या बाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आज काढले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आल्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली आली असून, गंभीर रुग्णांचीही संख्या दीडशेच्या आत आहे.कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शहरात लागू केलेले कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल केले जात आहेत.

सध्या शहरातील सर्व हॉटेल रात्री अकरा पर्यंत सुरू होती.आजपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत.महापालिकेने आज काढलेल्या आदेशात शहरातील सर्व व्यापारी दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहतील, रेस्टॉरंट, बार, फुडकोर्ट आठवड्याचे सर्व दिवस रात्री १२ पर्यंत खुली राहतील. या आदेशामुळे हॉटेल सुरू राहण्याची वेळ एका तासाने वाढली आहे.

ॲम्युझमेंट पार्कमधील पाण्यातील खेळांना अद्याप बंदी घालण्यात आली असून, केवळ कोरड्या जागेतील खेळांना परवानगी असणार आहे. हे आदेश पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील लागू करण्यात आले आहेत.हे आदेश प्राणी संग्रहालयास लागू नसल्याने त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT