Sujay Vikhe Patil, Milind Narvekar
Sujay Vikhe Patil, Milind Narvekar sarkarnama
पुणे

सुजय विखे पाटील आणि माझे बोलणे झाले आहे; भविष्यात ते धनुष्यबाण हाती घेतील : नार्वेकरांची गुगली

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एरव्ही राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी फलंदाची करणारे राजकीय नेत्यांची क्रिकेटच्या मैदानातली कामगिरी जोरदारपणे रंगली आहे. मैदानावरही जोरदार फटकेबाजी रंगली.

स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले, इथे सर्वांचे जर्सीमधील फोटो काढून ठेवा. कारण हे पुढे कायमस्वरुपी याच संघात राहतील का याची काळजी सरकानामाने घ्यायची आहे. त्यावर शिवचेनेचे (Shivsena) नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) म्हणाले, सुजय विखे पाटील आणि माझे बोलणे झाले आहे, ते भविष्यात धनुष्यबाण हाती घेतील, असा टोला लगावाल.

भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये भाजपची फंलदांजी आहे. भाजच्या टीमचे कॅप्टन अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रिकेटनामा स्पर्धेचे उद्घाटन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या उकाळ्या-पाकळ्या काढून गढूळ झालेले महाराष्ट्रातील राजकारण शांत करण्यासाठी सरकारनामाची ही स्पर्धा मदत करेल असे ते म्हणाले.

दरम्यान, सामना सुरु झाल्यानंतर महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात करुन दिल्ली गाठण्याचा इरादा करणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी पुण्याच्या मैदानावर रोखले. शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर मिलिंद नार्वेकर यांनी मोहोळ यांची विकेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT