Harshvardhan Patil- Datartray Bharane-Ajit pawar Sarkarnama
पुणे

Indapur Vidhan Sabha Election 2024 : 'दलबदलू' चा 'अद्श्य हात', कसा विश्वास ठेवायचा? आम्ही त्यांना राज्यपाल करणार होतो! पण...

Ajit Pawar criticize Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताना आमचा अदृश्य हात होता असे विधान नुकतेच केले. त्याचा समाचार अजितदादांनी घेतला. अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर जहरी टीका केली.

Mangesh Mahale

Indapur News: इंदापूर मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्यपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. इंदापूर मतदारसंघाचे उमेदवार दत्ता भरणे यांच्या प्रचार सभेत अजितदादा बोलत होते.

हर्षवर्धन पाटलांना आम्ही राज्यपाल करणार होतो, असे सांगत अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख 'दलबदलू' असा केला. तुम्ही चार-चार वेळा निवडून आला पण इंदापूरचा विकास केला नाही, अशी टीका अजित पवार यांनी केला. दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार बोलत होते.

हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताना आमचा अदृश्य हात होता असे विधान नुकतेच केले. त्याचा समाचार अजितदादांनी घेतला. अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर जहरी टीका केली.

त्यांनी (हर्षवर्धन पाटील) आम्हाला लोकसभा निवडणुकीत आश्वासने दिली. त्यांच्या घरी आम्हाला बोलावले. जेवू घातले, पण प्रत्यक्षात अदृश्य हात 'तुतारी'साठी वापरला, असे तुम्ही म्हणत असाल, तर ही गोष्ट कोणत्या नैतिकेत बसते? ज्या पक्षांमध्ये आपण असतो त्या पक्षाचेही आपण काम करीत नाही. अशा दलबदलू नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल अजित पवार यांनी केला. इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

आता व्याजासकट वसूल करा

"विधान परिषद 12 जागा भरायच्या होत्या. त्यातील सात जागा भरल्या. पाच जागा राहिल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं होते. आम्ही त्यांना (हर्षवर्धन पाटील) त्यात आमदारकी देणार होतो. पण त्यांची थांबायची तयारीच नव्हती, आता व्याजासकट वसूल करा," असे अजितदादांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT