Maharudra Patil
Maharudra Patil  Sarkarnama
पुणे

Indapur Politics : पवार निष्ठावंतांवर इंदापुरात अन्याय; भरणे गट म्हणजे कमिशन गोळा करणारी टोळी : महारुद्र पाटलांचा आरोप

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पवारांना (Pawar) मानणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) हे त्यांचा स्वतंत्र गट तयार करीत आहेत. हा गट नसून कमिशन गोळा करणारी टोळी आहे, अशा घणाघाती आरोप नुकतेच राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील (Maharudra Patil) यांनी केला. (Injustice against Pawar loyalists in Indapur: Maharudra Patil alleges)

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत महारुद्र पाटील यांनी भरणे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या वेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, सुदर्शन साखरे, सीमा कल्याणकर, अशोक देवकर, वसंत आरडे, देविदास भोंग, माजी सभापती सुभाष जगताप, सूरज काळे, वैभव जामदार, बबन खराडे, अण्णा काळे, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

महारुद्र पाटील म्हणाले की, लोकसभेला ज्या लोकांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार केला, तेच लोक विधानसभेला भरणे यांच्याबरोबर होते. यावरूनच बरेच काही स्पष्ट होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप मोठा उद्रेक असून येणाऱ्या काळात तो बाहेर पडेल आणि २०२४ मध्ये याचे परिणाम भोगावे लागतील. तसेच, ‘जो निवडून येईल, तो आपला’ असले धंदे भरणे यांनी बंद करून कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

इंदापुरात तिसरी शक्ती उदयास येणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. इंदापूर तालुक्यात आगामी काळात तिसरी शक्ती उदयास येईल. तसेच, अनेक मोठे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २०२४ मध्ये प्रतिष्ठेची होणार आहे, असे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र देवरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT