Chandrakant Patil   sarkarnama
पुणे

Ink Attack : चंद्रकांतदादांच्या सूचनेनंतरही ११ पोलीस निलंबित ; कुणाच्या आदेशावरुन कारवाई ?

Chandrakant Patil Ink Attack : 8 शिपाई आणि 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Patil Ink Attack : भाजप नेते, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे काल (शनिवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये मध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

चंद्रकात पाटलांवर झालेल्या शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही पोलिसांवरही कारवाई करण्यात का करण्यात आली. याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.

बदमाश कोण हे कळणार कसे?

"पोलिसांना दोष देण्याचे कारण नाही. पोलिसांनी कुणाकुणावर लक्ष द्यायचे. कार्यकर्ता कोण आणि बदमाश कोण हे कळणार कसे? मी देवेंद्र फडणवीसांना सांगितले आहे की, कुणावरही कारवाई करु नका. मी सर्व कार्यक्रमाला जाणार आहे," असे चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते. या प्रकरणी आज सकाळी ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे कुणाच्या आदेशावरुन ही पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानंतर शनिवारी त्यांच्यावर शाईफेक (Ink Attack) करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापलं आहे.

त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या वक्तव्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करण्यास तयार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटले होते. त्यानंतर पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मात्र आता याप्रकरणी 8 शिपाई आणि 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांमध्ये मनोज घरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचा सहभाग होता. पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत. एका पत्रकारालाही अटक केली असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT